breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींकडे केली मोठी मागणी

Mitchell Marsh : विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. हा पराभव कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, भारतीय संघातील खेळाडू आणि १४० कोटी भारतीयांचे मन दुखावून गेला. यातच ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममधला मिशेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवून काढलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान, मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

अलिगढमधील आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी मिशेलच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या खेळाडूला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा  –  तू कुठं काय केलंस? अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला 

दरम्यान, मिशेल मार्शने या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, २३ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button